Rg. No. YML/BNK/114
ISO 9001:2015 & ISO 27001:2013 CERTIFIED BANK
बाभुळगाव शाखा व्यवस्थापक श्री. प्रेमराज भोयर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळच्या बाभुळगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. प्रेमराज भोयर हे दिनांक ३१ मे २०२६ रोजी बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या यशस्वी सेवापूर्तीबद्दल बँकेच्या मुख्य कार्यालय, यवतमाळ येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बँकेचे माननीय अध्यक्ष डॉ. खर्चे सर आणि माननीय संचालक मंडळाच्या हस्ते श्री. भोयर यांचा शाल, श्रीफळ आणि सत्कारचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला बँकेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बँकेने श्री. प्रेमराज भोयर यांच्या भावी निरोगी व आनंदी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.