Rg. No. YML/BNK/114

Rg. No. YML/BNK/114
ISO 9001:2015 & ISO 27001:2013 CERTIFIED BANK

डॉ. नितीन खर्चे यांच्या हस्ते यवतमाळ-पंढरपूर बसचे उद्घाटन

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर यवतमाळ बस स्थानक आगार येथून ‘यवतमाळ ते पंढरपूर’ विशेष बस सेवेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या विशेष बस सेवेचे उद्घाटन बँकेचे सन्माननीय अध्यक्ष मा. डॉ. नितीन खर्चे सर यांच्या हस्ते पार पडले. वारकऱ्यांच्या प्रवासाला सोयीस्कर दिशा मिळावी यासाठी बँकेतर्फे यवतमाळ बस स्थानकाला ‘मार्ग फलक बोर्ड’ सप्रेम भेट देण्यात आले. या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री. श्रीधर कोहरे साहेब, मा. श्री. गजानन वैद्य साहेब, मा. श्री. सुनील खातखेडकर साहेब, यवतमाळ आगाराचे आगार प्रमुख तसेच इतर प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.