Rg. No. YML/BNK/114

Rg. No. YML/BNK/114
ISO 9001:2015 & ISO 27001:2013 CERTIFIED BANK

मुंबई येथील ‘सहकार नव-क्रांती’ कार्यक्रमात यवतमाळ अर्बन बँकेचे मा. अध्यक्ष व उपाध्यक्षांची प्रमुख उपस्थिती

दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), दलाल स्ट्रीट, मुंबई येथे आयोजित ‘सहकार नव-क्रांती’ कार्यक्रमात यवतमाळ अर्बन बँकेतर्फे मा. अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे आणि मा. उपाध्यक्ष श्री. अजिंदारसिह चावला उपस्थित होते. केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित भाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शहरी सहकारी बँकांमध्ये नव-विचार, नव-तंत्रज्ञान आणि डिजिटल सशक्तीकरणाला चालना देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या परिषदेच्या माध्यमातून यवतमाळ अर्बन बँक आपल्या ग्राहकांना अधिक आधुनिक व डिजिटल सेवा देण्याच्या दृष्टीने सातत्याने पुढे जात आहे.