Rg. No. YML/BNK/114

Rg. No. YML/BNK/114
ISO 9001:2015 & ISO 27001:2013 CERTIFIED BANK

दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ तर्फे कर्मचारी पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

यवतमाळ: दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ च्या मुख्य कार्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

 

या सोहळ्यात बँकेच्या संचालक मंडळातील सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल बँकेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करण्यात आले व त्यांना भावी शैक्षणिक प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.