विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या तसेच सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यवतमाळ अर्बन बँकेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक प्रगती नोंदवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वैधानिक लेखा परीक्षणात (Statutory Audit) बँकेला ‘अ’ वर्ग (Class ‘A’) दर्जा मिळाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू सभासदांना कर्जवाटप करून त्यांच्या आर्थिक विकासात बँकेने सातत्याने योगदान दिले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाबद्दल बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने सर्व ग्राहक व सभासदांचे आभार मानले असून उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.