दि. 21 डिसेंबर रोजी पुणे येथे ग्रीन वर्ल्ड पब्लिकेश व कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने “सहकार मंथन “या कार्यक्रमात यवतमाळ अर्बन बँकेला सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, उपाध्यक्ष श्री अजिंदर सिंह चावला आणि CEO श्री श्रीधर कोहरे यांनी स्वीकारला. याप्रसंगी ग्रीन वर्ल्डचे गौतम कोतवाल आणि कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष मिलिंदजी काळे हे उपस्थित होते.
विशेष म्हणजे या पुरस्काराने सन्मानीत यवतमाळ अर्बन बँक ही विदर्भातील एकमेव बँक आहे..